उगवत्या सूर्याचा देश
उगवत्या सूर्याचा देश जपान. एक वेगळा देश. हटके. खूप उत्सुकता होती. आणि योग जुळून आला. जपानचं निसर्गसौंदर्य, जपानी कला-संस्कृती आणि मुख्य म्हणजे जपानी लोकांशी जवळून परिचय होण्याचा. आत्तापर्यंत अनेक लोकांकडून ऐकलं होतं , की जपान पाहून सगळे जपानच्या प्रेमात पडतात. आमचे मित्र राहुल देव यांनी हौसेनं आमच्यासाठी ‘ सरप्राईझिंग जपान’ची टूर आखली. इतर पर्यटकांप्रमाणे आम्हीही अनेक श्राईन्स आणि टेम्पल्स बघितली. बुद्धाची मूर्त असलेल्या ठिकाणांना सहसा टेम्पल म्हणजे देऊळ म्हणतात, असं कळलं. पण नंतर लक्षात आलं की हे इंग्रजी शब्द इतक्या काटेकोरपणे वापरले जात नाहीत. खरं तर कित्येक प्रार्थना घरांमध्ये शिंतो आणि बौद्ध घटक आणि तत्त्वं दिसतात. शिंतो धर्माच्या आणि इतर पंथांच्या श्राईन्समध्ये म्हणजे मोठ्या गाभा-यांमध्ये मूर्ती नसतात, हाच महत्वाचं फरक आहे. काही ठिकाणी आम्हाला पठण आणि इतर धार्मिक समारंभही बघायला मिळाले. आपल्या देवालयांप्रमाणे काही खूप श्रीमंत आणि काही गरीब श्राईन्स होते. काही ठिकाणी ट्रस्टीमधल्या झगड्याबद्दलही ऐकायला मिळालं! प्रत्येक श्राईन किंवा टेम्पल बघण्यासाठी प्रत्येक व्यक्तील...